Dainik Maval News : तळेगाव ते चाकण महामार्गावर असणारे खड्डे आणि रस्त्याची झालेली दुर्दशा याबद्दल आज, रविवारी (दि. ५ ऑक्टोबर) रोजी तळेगाव दाभाडे शहरातील मराठा क्रांती चौक येथे उपोषण करण्यात येणार आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झालेले समस्त तळेगावकर नागरिकांच्या वतीने हे जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. रविवारी ठिक सकाळी दहा वाजता हे आंदोलन अर्थात उपोषण सुरु होणार आहे.
तळेगाव – चाकण रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधामध्ये व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात तळेगावकर नागरिकांनी 5 ऑक्टोबर रोजी जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
तळेगाव स्टेशन येथील मराठा क्रांती चौक या ठिकाणी सदरचे जन आंदोलन करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभागी होत प्रशासनाचा निषेध नोंदवावा व जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन तळेगावकर नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
जन आंदोलना नंतर देखील सार्वजनिक बांधकाम विभाग असो व महाराष्ट्र शासन असो यापैकी कोणाचे डोळे उघडले जात नसल्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी जनआंदोलन उपोषण व वेळ पडल्यास रास्ता रोको देखील केला जाणार आहे. नागरिकांचा सहभाग हा उद्याचे अपघात रोखण्यासाठी व निष्पाप नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याने तळेगावकर प्रत्येक नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय