Dainik Maval News : सातत्याने वेळी अवेळी वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पवन मावळ ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या महिन्या भागापासून विजेचा लपंडाव सुरु असून अधिकारी व कर्मचारी यांनी संपूर्ण उन्हाळ्यात काय काम केलं? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
- पवन मावळ विभागातील ४२ वाड्यावस्त्यांवर विजेचा लपंडाव होत असून याबाबत नागरिक वारंवार तक्रारी देऊन देखील अधिकारी व कर्मचारी कडून तक्रारींचे निवारण केले जात नाही. अखेर संतप्त नागरिकांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून शाल व श्रीफळ आणि भल्या मोठ्या दोरीचा हार घालून निषेधात्मक सन्मान केला.
सध्या राज्यासह मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब तर विद्युत तारा पडल्या आहेत. यामुळे विजेचा पुरवठा विस्कळीत होत आहे. पवन मावळ हा ग्रामीण भाग असून या ठिकाणी छोटे मोठे व्यवसाय असून दिवसा व रात्री लाईट गेल्याने हजारो रुपयांचे नुकसान होते. असा वीज विभागाचे कर्मचारी वेळेत कामे करीत नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
गेल्या महिन्याभारापासून आमच्या भागात लाईटची समस्या मोठ्या प्रमाणात असून आमच्या काले पवनानगर हा परिसर ४२ गाव वाड्या वस्त्यांवरील मुख्य बाजारपेठ असून या ठिकाणी छोटे-मोठे व्यवसायिक व्यापारी आहेत लाईटीच्या लपंडावामुळे त्यांना मोठ्या आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे, अशी प्रतिक्रिया अतुल लक्ष्मण कालेकर यांनी दिली.
मी गेल्या दहा दिवसापूर्वी या कार्यालयात बदलीने रुजू झालो असून झालेल्या तक्रारीचे निवारण येत्या आठवडे भरात करेल, असे आश्वासन अमय रामगिरी, शाखा अभियंता, काले कॉलनी महावितरण यांनी दिले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी
– तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
– “बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे