व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवन मावळची पहिली महिला सनदी लेखापाल ; कामशेतमधील लब्धी छाजेड हिचे सीए परीक्षेत यश । Maval News

सनदी लेखापाल परीक्षेत यश मिळविण्यासाठी लब्धीने दररोज आठ तास अभ्यास केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 9, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Pawan Maval first female chartered accountant Labdhi Chhajed from Kamshet passes CA exam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कामशेत येथील लब्धी छाजेड हिने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) मार्फत मे २०२५ मध्ये घेतलेल्या सीए अंतिम परीक्षेत यश संपादन केले आहे. या यशासह लब्धी हिने पवन मावळ परिसरातून पहिली महिला सनदी लेखापाल होण्याचा मान पटकावला आहे. या उज्वल यशाबद्दल संपूर्ण मावळ तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  • लब्धीचे प्राथमिक शिक्षण लोणावळा येथील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. पुढे तिने पुण्यातील नेस वाडिया महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. इयत्ता बारावीनंतर तिने सीए परीक्षेची तयारी सुरू केली होती. फाउंडेशन कोर्समध्ये २५६ गुणांनी यश मिळविले. इंटरमिजिएटच्या ग्रुप १ मध्ये २३८ आणि ग्रुप २ मध्ये ३१२ गुण मिळवत तिने पुढील टप्पा पार केला. अंतिम परीक्षेत तिने ग्रुप १ मध्ये १५९ आणि ग्रुप २ मध्ये १५८ असे एकूण ३१७ गुण मिळवत उज्वल यश मिळविले.

सनदी लेखापाल परीक्षेत यश मिळविण्यासाठी लब्धीने दररोज आठ तास अभ्यास केला. सोबत तिच्या या यशात तिची आई विमल, वडील जगदीश तसेच संपूर्ण छाजेड परिवाराचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. सनदी लेखापाल परीक्षेत यश मिळाल्याबद्दल डॉ. नयना राठोड, डॉ. नितीन राठोड यांसह विविध मान्यवरांनी लब्धीच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन केले.

मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही पवनानगर येथून कामशेतला स्थलांतरित झालो. लब्धीने सनदी लेखापाल व्हावे, हे स्वप्न होते. तिने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे स्वप्न वास्तवात आणले, याचा आम्हाला खूप आनंद आहे, अशी प्रतिक्रिया लब्धीचे वडील जगदीश छाजेड यांनी दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी
– तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
– “बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे


Previous Post

पवन मावळ परिसरात विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण ! संतप्त नागरिकांनी केला अधिकाऱ्यांचा सत्कार । Pavan Maval

Next Post

पवनानगर चौकातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था ; स्थानिकांसह पर्यटकांनाही होतोय त्रास । Pavana Nagar

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
road in Pavananagar is in very poor condition Locals as well as tourists are facing problems

पवनानगर चौकातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था ; स्थानिकांसह पर्यटकांनाही होतोय त्रास । Pavana Nagar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.