Dainik Maval News : स्वच्छ सर्वेक्षण २०२५ व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम यांनी शहरातील नागरिकांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केलेले होते. या आवाहनाला शहरातील बहुतांशी नागररिकांनी उत्सफुर्तपणे प्रतिसाद देवून घरोघरी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तसेच प्लास्टिक व थर्माकोलचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यात आली होती.
शहरातील सर्व स्वच्छताप्रेमी नागरीकांनी गणेश विसर्जन करतेवेळी सर्व निर्माल्य विसर्जन स्थळी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशामध्ये टाकून पर्यावरणाचे प्रदुषण रोखण्यासाठी सहकार्य करावे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज बनत चालली आहे. यामुळे सर्व नागरीकांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी केले होते.
त्यानुसार शहरात माळीनगर क्रिकेट ग्राउंड जवळ, विजयनगर पीडीसीसी बॅंक जवळ, केशवनगर पाण्याच्या टाकी जवळ, प्रभाग क्रमांक१६ पाणी टाकी लगत, विशाल लॉन्स मागे संभाजी नगर परिसर, वडगाव स्मशानभूमी मागे, पोटोबा मंदिर प्रांगण, टेल्को कॉलनी, मोरया कॉलनी अश्या आठ ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौद व निर्माल्य कलश तयार करण्यात आले होते. व तसेच नगरपंचायत कार्यालय येथे श्री गणेश मूर्ती दान केंद्र तयार करण्यात आले होते.
मुख्याधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला नागररिकांनी उत्सफुर्तपणे प्रतिसाद देत सुमारे २८५० श्री गणेश मूर्तींचे कृत्रिम विसर्जन तलावात विसर्जन झाले व सुमारे २ मे.टन निर्माल्य संकलन झाले.
जलप्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने नागरिकांना गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यानुसार नागरिकांनी नगरपंचायत मार्फत तयार करण्यात आलेल्या मूर्तीदान यामध्ये, जय मल्हार ग्रुप, स्वप्नील तांबे, कमलेश सोळंकी, नितीन कांबळे, किशोर कांबळे, नीलिमा पवार इत्यादी पर्यावरण प्रेमींनी स्वईच्छेने मूर्ती दान केल्या.
नगरपंचायत मार्फत निर्माल्य संकलन करिता निर्माल्या रथाची व्यवस्था करण्यात आली होती. सदर रथाद्वारे सर्व सार्वजनिक गणेश मंडळाचे निर्मल्य दैनंदिन स्वरूपात संकलन करण्यात येत होते .
“वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण, यामुळे कमी होते प्रदूषण.”
पाण्याचे कराल संरक्षण, वसुधंरेचे होईल रक्षण
एकच ठेवू मिशन, कमी करू वायू प्रदूषण
आपण क्रांती घडवूया, प्लास्टिक प्रदूषण गुडबाय करूया
मिळून सारे वचन घेऊ, वातावरण आपलं स्वच्छ करु.
आज वीज वाचवा, उद्या प्रकाश सजवा.
हरित सण साजरे करा!
छतावरील पाण्याचे पुनर्भरण करा!
पर्यावरण दूत बना
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ ; आता मिळणार ‘इतके’ पैसे
– वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजूरी ; इमारत बांधण्यासाठी १०९ कोटी ८ लक्ष निधीस मान्यता
– मोठी बातमी ! पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता