Dainik Maval News : केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MOHUA) भारत सरकार यांनी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवडा मार्फत “स्वच्छता ही सेवा” (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता ) ही मोहीम देशात दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
सदर मोहिमे अंतर्गत मंगळवारी, दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तलाव स्वच्छता हा उपक्रम घेण्यात आला. याअंतर्गत वडगांव शहरातील अध्यापक महाविद्यालयाच्या विध्यार्थी व विद्यार्थिनीं, सफाई कर्मचारी व नागरिक यांनी शरातून स्वच्छता रॅली काढील व तसेच ग्राम दैवत श्री क्षेत्र पोटोबा महाराज देवस्थान ऐतिहासिक तलावाची झाडी- झुपडे काढण्यात आली व तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पूर्वसूचना न देता केलेल्या ब्लास्टिंगमुळे एकाचा मृत्यू, मंगरुळ येथील घटना, गुन्हा दाखल । Talegaon News
– विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास राज्य सरकारची मान्यता ; 4 हजार 860 पदे विशेष शिक्षकांसाठी राखून ठेवणार
– सोनार समाजासाठी ‘संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय