मावळ तालुक्यातील मोरवे शाळेत ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन करुन सरपंच सुनिल शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीतांचे गायन करण्यात आले. तर प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी महाराष्ट्राची संस्कृती व संस्कार आणि इतिहासाबद्दल मार्गदर्शन केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक शरद शिंदे यांनी केले. या प्रसंगी मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शाळा, मंदिर ग्रामपंचायत व गावातील इतर परिसरात झाडू मारुन व कचरा उचलून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच सुनिल शिंदे, ग्रामसेवक आप्पासाहेब भानवसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनिषा घारे, तनिष्का प्रेरणा प्रतिष्ठान च्या अध्यक्षा अन्नपूर्णा पाखरे, शकुंतला गोणते, वनिता शिंदे, सखुबाई वांजळे, अनिकेत गाऊडसे, गोविंद गाऊडसे, काशिनाथ घारे, संतोष वांजळे ऋषिकेश शिंदे, दिनकर कदम इतर मान्यवर उपस्थित होते. शेवटी ग्रामसेवक आप्पासाहेब भानवसे यांनी सर्वांचे आभार मानले व सर्वांना गोड खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. ( Cleanliness campaign on occasion of 1st may Maharashtra Day by Morve Zilla Parishad School students )
अधिक वाचा –
– मावळमधील पहिला ‘आपला दवाखाना’ तळेगावमध्ये सुरु, बाळा भेगडेंच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्र्यांकडून ऑनलाईन शुभारंभ
– वडगावात ‘मल्हार’ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा । Maharashtra Din 2023