व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 29, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रोजेक्ट ‘अमृत’ अंतर्गत वडगाव मावळ शहरातील ऐतिहासिक तलाव आणि परिसराची स्वच्छता । Vadgaon Maval

सदर अभियान रविवारी देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 900 पेक्षा अधिक शहरांमध्ये 5600 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 24, 2025
in लोकल, शहर
Cleanliness of historic lake and surroundings in Vadgaon Maval town under Project Amrit

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण व माजी वसुंधरा अभियान अंतर्गत थोर संत गाडगे बाबा महाराज व निरंकारी बाबा हरदेव सिंग महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, संत निरंकारी मंडळ तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ व वडगाव नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.23 फेब्रुवारी) प्रोजेक्ट ‘अमृत’ अंतर्गत शहरातील तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज मंदिर परिसरातील ऐतिहासिक तलाव, दत्त मंदिर परिसर, बाजारपेठ परिसर, मुंबई-पुणे महामार्ग दुतर्फा श्रमदान करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

संत निरंकारी मिशनचे बाबा हरदेव सिंग जी यांच्या प्रेरणादायी शिकवणुकींना आत्मसात करीत वर्ष 2023 मध्ये सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या सहयोगाने ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ केला होता. याचा उद्देश केवळ जल स्रोतांची स्वच्छता नसून जल संरक्षण करण्यासाठी मानवी जीवनास जल संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे व त्याबाबतचा विचार विकसित करणे हा आहे.

  • सदर अभियान रविवारी देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 900 पेक्षा अधिक शहरांमध्ये 5600 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे अभियानाची व्यापकता अधिक होती.

परम श्रद्धेय सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या सानिध्यात यमुना नदी नदीकाठ दिल्ली येथे स्वच्छता केली जाते, त्याच अनुषंगाने निरंकारी मंडळ तळेगाव दाभाडे, वडगाव मावळचे सुमारे 150 सदस्य यांनी वडगाव नगरपंचायत हद्दीत श्रमदान करून सेवा दिली.

सदर अभियानात सुमारे दोन टन कचरा जमा करण्यात आला. अभियानात वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक, माजी नगराध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, शहरातील नागरिक उपस्थित होते. स्वच्छतेचे नियोजन व साहित्य वाटप नगरपंचायती मार्फत करण्यात आले. तसेच सेवेकऱ्यांना प्रसादाचे नियोजन मोरया प्रतिष्ठान यांच्यामार्फत करण्यात आले होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


Previous Post

छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा ; अखंड मराठा समाज मावळ यांची मागणी । Vadgaon Maval

Next Post

शिक्षक परिषद मावळच्या अध्यक्षपदी राम कदमबांडे, तर कार्यवाहपदी देवराम पारीठे यांची निवड ; पाहा संपूर्ण नूतन कार्यकारिणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra State Teachers Council Maval Ram Kadambande as President Devaram Parithe as acting post

शिक्षक परिषद मावळच्या अध्यक्षपदी राम कदमबांडे, तर कार्यवाहपदी देवराम पारीठे यांची निवड ; पाहा संपूर्ण नूतन कार्यकारिणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

sahakar

राज्याच्या सहकार चळवळीत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांचा होणार गौरव ; 18 जुलैपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

June 29, 2025
Pradhan Mantri Dharti Aaba Tribal Village Upliftment Mission In Pune District

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान; पुणे जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी काम करावे – आदिवासी विकास मंत्री

June 29, 2025
Meeting of concrete decisions for tribal development Review of campaign at Collector Office Pune

आदिवासी विकासासाठी ठोस निर्णयांची बैठक ; जिल्हाधिकारी कार्यालयात महाअभियानांचा आढावा

June 29, 2025
Ekvira-Devi

मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक

June 29, 2025
Talegaon Municipal Council appeals to citizens to plant indigenous trees such as bamboo shevga etc

तळेगाव नगरपरिषदेच्या वतीने बांबू, शेवगा आदी देशी वृक्षांच्या लागवडीसाठी नागरिकांना आवाहन । Talegaon Dabhade

June 29, 2025
man jumped into Indrayani river from British-era bridge in Indori Maval

इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारणाऱ्या तरुणाची ओळख पटली । Maval News

June 29, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.