पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या हेतूने ‘कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळ प्रशासन, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्यावतीने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या सहभागातून प्लास्टिकमुक्त तळेगाव शहर हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रोटरी क्लबचे संस्थापक संतोष खांडगे आणि शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सदर उपक्रमाची माहिती दिली. ( Clothes bag to protects environment Talegaon dabhade city determined to be plastic free )
तळेगाव शहरातील 30 हजार विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालाच्या दिवशी कापडी पिशव्या, शपथपत्र आणि माहिती पुस्तिकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. ‘प्लास्टिक हटाओ, सृष्टी बचाओ’ घराघरात पोचावा यासाठी विद्यार्थी हेच प्रभावी दूत असल्याने त्यांच्या माध्यमातून पालकांना सहभागी करून घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी सुमारे 12 लाख रुपये किमतीच्या 30 हजार कापडी पिशव्यांचे वाटप सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना 29 एप्रिल आणि 1 मे दरम्यान करण्यात येणार आहे, अशी माहिती संतोष खांडगे यांनी दिली.
अधिक वाचा –
– तळेगावातील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा जाधववाडी धरणात बुडून मृत्यू
– सॅल्यूट!! वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार अमोल कसबेकर यांचा पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर