नवलाख उंबरे जवळील जाधववाडी धरणात फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या तळेगाव दाभाडे शहरातील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ जवानाच्या कार्यतत्परतेमुळे अन्य दोघांना जीवदान मिळाले. मात्र, आदित्य शरद राहणे (वय 21) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (दिनांक 25 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील नूतन इंजिनिअरिंग कॉलेजच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी पाच विद्यार्थी जाधववाडी धरण परिसरात मंगळवारी (दि 25) सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी आले होते. यावेळी भीमाशंकर दिनेश मठपती (वय 21), आदित्य जितेंद्र नेवे (वय 21) आणि आदित्य शरद राहणे (वय 21) हे तिघे जण जाधववाडी धरण पाणलोट क्षेत्रातील पाण्यात उतरले.
परंतू, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आदित्य राहणे हा पाण्यात बुडून मयत झाला. त्याला तळेगाव जनरल हॉस्पिटल इथे दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सदर घटनेचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. ( student of NCER college of talegaon dabhade drowned in jadhavwadi dam navlakh umbre )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पवना धरणात बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अखेर यंत्रणांना यश
– सॅल्यूट!! वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार अमोल कसबेकर यांचा पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर