व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत ” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ” संपन्न

नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 17, 2026
in लोकल, मावळकट्टा, शहर
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajasva Camp held at Talegaon Dabhade Municipal Council

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयामध्ये महसूल विभाग आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व‌‌‌ समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

हा महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असून शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित “महाराजस्व समाधान शिबिर” हे अभियान दि. १५ मे २०२६ रोजी राबविले गेले. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारचे दाखले, जमीन जुमल्याची कागदपत्रे किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार सरकारी कचऱ्यांमध्ये हेलपाटे मारावे लागतात ही प्रक्रिया सोपी व्हावी आणि प्रशासनाने स्वतः जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या तक्रारींचे निवारण करावे या विचारातून सदरचे समाधान शिबिर राबविण्यात आले होते.

या शिबिराला तहसीलदार विक्रम देशमुख, नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे,आरोग्य समिती सभापती निखील भगत,नगरसेवक सागर बोडके, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, माणिक साबळे तसेच नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी तसेच नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.

शिबिरात तळेगाव दाभाडे शहरातील आणि शहराच्या शेजारील गावातील नागरिकांना हवे असलेले दाखले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यामध्ये निवासी दाखला ( Domicile Certificate), जातीचे प्रमाणपत्र ( Cast certificate), चारित्र्य दाखला ( non Crimilear certificate) , जन्म दाखला (Birth certificate), विवाह नोंदणी दाखला (Marriage Registration certificate), नळ जोड आदेश तसेच तालुका कृषी विभागाच्या वतीने प्रमाणपत्रे देण्यात आली तसेच पंचायत समिती वडगाव मावळ महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गरोदर महिलांसाठी बेबी केअर किट, मनीषा रवी शेळके (माळवाडी) यांना देण्यात आले.

यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सदरचे शिबिर आयोजित करण्याच्या पाठीमागचा उद्देश सांगितला तसेच नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी सुद्धा सदर शिबिर नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागू नये म्हणून नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात आल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी भास्कर वाघमारे यांनी केले.नियोजन भांडार प्रमुख रोहित भोसले,करसंकलन प्रमुख कल्याणी लाडे,विभा वाणी यांनी केले.आभार मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी मानले.

यावेळी जातीचा दाखला – १५, उत्त्पन्न दाखला – ४५, निवासी दाखला -२७, चारित्र्य दाखला – ३४, तलाठी उत्त्पन्न दाखला -१३४, एक खिडकी योजना – १०, आधार नोंदणी – ४०, विवाह नोंदणी दाखला – ०७, जन्म दाखला – ०८, नळ जोडणी आदेश -०१, बचत गट नोंदणी प्रमाणपत्र – ०२ या दाखल्याचे वाटप करण्यात आले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी ! तळेगाव नगरपरिषदेकडून कनिष्ठ महाविद्यालयाची घोषणा
– कुंभार कारागिरांना 9 महिने उचलता येणार माती, 700 ब्रासच्या मर्यादेवर कोणताही दंड नाही ; वीटभट्टीसाठी ५ वर्षांसाठी सलग परवानगी मिळणार
– पशुपालकांनो.. पशुधनाची काळजी घ्या, पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ‘या’ उपाययोजना करा 


dainik maval jahirat

Previous Post

अज्ञात आरोपीकडून एकावर झोपेतच प्राणघातक हल्ला ; निळशी येथील धक्कादायक प्रकार

Next Post

पुणे जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
House listing and census process begins in Pune district

पुणे जिल्ह्यात घरसुचीकरण व गृहगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.