लोणावळा इथे पिकनिक साठी आलेल्या ग्रुपमधील एक तरुण रविवारी (दिनांक 23 एप्रिल) दुपारी पवना धरण जलाशयात बुडाला होता. त्याचा शोध घेण्यात आणि त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यंत्रणांना अखेर दुसऱ्या दिवशी सोमवारी यश आले आहे. फांगणे गावच्या हद्दीत पवना धरण जलाशयात ही घटना घडली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
साहिल विजय सावंत (वय 18, रा. लोअर परेल, मुंबई) असे पवना धरणात बुडून मृत पावलेल्या सदर तरुणाचे नाव आहे. शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, वन्यजीव रक्षक दल मावळ, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था रायगड यांच्या संयुक्त शोध मोहिमेला सोमवारी (दिनांक 24 एप्रिल, दुपारी पाऊणे दोन) यश आले आहे. ( body of drowned youth in Pavana Dam has been recovered )
मुंबई भागातून 18 युवक-युवतींचा एक ग्रुप लोणावळा भागात फिरायला आला होता. लोणावळा पिकनिक नंतर हे सर्व जण पवना धरण भागात आले होते. तेव्हा त्यातील काहींना धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यातीलच एक साहील हा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात जाऊन बुडाला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ गोळा झाले आणि नंतर लोणावळा ग्रामीण पोलिस दल व आपदा मित्र घटनास्थळी दाखल झाले.
रविवारी मावळ तालुक्यातील आपदा मित्र, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र मावळ आणि लोणावळा ग्रामीण पोलिस यांच्याकडून सदर तरुणाचा शोध घेण्यात आला. मात्र रविवारी त्याचा शोध न लागल्याने शोध मोहिम थांबवून आज सोमवारी पुन्हा शोध मोहिम सुरु करण्यात आली आणि दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
अधिक वाचा –
– टायगर पॉईंट इथे वेळेचे बंधन न पाळणाऱ्या टपरी चालकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई
– जमिनीची खरेदी-विक्री करताना ‘या’ 5 गोष्टी जरूर तपासा, अन्यथा भविष्यात येऊ शकतात अनेक अडचणी; वाचा सविस्तर