Dainik Maval News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज (रविवार, दि. 8 जून) आंबी, मावळ येथील पुष्पलता डी वाय पाटील रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे.
दुपारी बाराच्या सुमारास हा सोहळा होणार असून याप्रसंगी डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. विजय पाटील, उपाध्यक्ष तथा उपकुलपती डॉ. शिवानी पाटील हेही उपस्थित राहणार आहेत. या नवीन रुग्णालयामुळे मावळ परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे.
आरोग्य सेवेच्या नवीन पर्वाची सुरुवात होत असल्याने या सोहळ्यास नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पुष्पलता पाटील रुग्णालय, डॉ डी वाय पाटील विद्यापीठ, एमआयडीसी रोड जवळ, आंबी- वारंगवाडी, ता. मावळ याठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश