Dainik Maval News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. ६) वित्तमंत्री म्हणून राज्याचा २०२६ – २०२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली आहे.
आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी समिती गठीत केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीककर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ केले जाईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, असे नव्या कर्जमाफी योजनेचे नाव असेल. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असल्याचे फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले आहे.
कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबत राज्यातील बँकिग यंत्रणा सक्षम असावी, यासाठी समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमचा कर्जमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजन केल्या जात आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
महायुती सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांकडून महायुती सरकारला शेतकरी कर्जमाफीच्या योजनेचे काय झाले, असा जाब विचारत होते. त्यासाठी वेळोवेळी आंदोलन झाली आहेत. निवडणूक झाल्यानंतर सरकार शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन विसरले, अशी टीकाही झाली होती. परंतु आता फडणवीस यांनी कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा
– वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर
