नाशिकजवळच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पात बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर 14 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही इथली आग अनियंत्रित आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महिमा (20) आणि अंजली (27) अशी दोन मृत महिलांची नावे आहेत. या दोघींना नाशिक आयसीयू अँड ट्रॉमा सेंटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांचा मृत्यू झाल आहे. इगतपुरी स्फोटात जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. स्फोटाची माहिती कळताच मुख्यमंत्र्यांनी सिल्लोडमधली सभा रद्द केली आणि ते नाशिकमध्ये पोहोचले. ( CM Eknath Shinde Announced Help To Those Who Killed In Blast At Jindal Polyfilm Company On Nashik Mumbai Highway )
#इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत #स्फोट झाला असून, #आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
सुयश हॉस्पिटलमध्ये जिंदाल कंपनीच्या स्फोटातील १५ रुग्ण दाखल झाले आहेत. पोलिस महानिरीक्षक डॉ. बी जी शेखर पाटील यांनी रुग्णांची भेट घेऊन चौकशी केली. pic.twitter.com/XKeZ1IQic2— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 1, 2023
“मुंढेगाव इथल्या कंपनीत भीषण आग लागली. 17 जण जखमी झाले. दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. पालकमंत्री तात्काळ पोहोचले. विविध यंत्रणांशी मी सातत्याने संपर्कात होतो. कंपनीत वरच्या भागात अडकलेल्या दोघांची सुटका करण्यात आली आहे. जखमींना मी भेटलो. डॉक्टरांशी भेटलो. जखमींवर सर्वोत्तम उपचार केले जातील. सरकार याचा खर्च उचलेल. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्यात येईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर करतानाच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील असेही मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी जाहीर केले. या दुर्घटनेमागील कारणे जाणून घेण्यासाठी या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.. pic.twitter.com/PvnKOqaeTu
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 1, 2023
हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये त्याचे हादरे जाणवले. स्फोटनंतर कंपनीला लागलेली आग मोठ्या प्रमाणात पसरली. आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये स्फोटाचा आवाज ऐकायला मिळाला. आग इतकी भीषण होती की धुराचे मोठ मोठे लोट आकाशात दिसत होते.
अधिक वाचा –
– सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत शोभेच्या दारूच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू
– कोरोनाचा सर्वात घातक व्हेरिएंट समोर, लस घेतली असेल तरीही होऊ शकते लागण, वाचा अधिक