मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथे यंदा पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती महोत्सव (दिनांक 14 मे) मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी मोठी घोषणा केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड, किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.
मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. याच कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल.
गेटवे ऑफ इंडिया येथे पहिल्यांदाच आयोजित… pic.twitter.com/eLRcQkzBqk— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 14, 2023
“छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही स्थळांचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. हा ऐतिहासिक ठेवा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणार” असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव देशभरात पोहचवला जाईल, यासह आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करण्याची तयारी देखील राज्य शासन करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितले. ( cm eknath shinde big announcement to give name of chhatrapati sambhaji maharaj to mumbai sea highway costal road )
अधिक वाचा –
– पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात साजरी करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
– कर्नाटक विधानसभा निकालानंतर मविआच्या सर्वोच्च नेत्यांची बैठक; जयंत पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही…’