Dainik Maval News : वडगाव मावळ येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा मंगळवार, दि. १४ एप्रिल रोजी संपन्न होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे व सामुदायिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष अनिल कोद्रे, कार्याध्यक्ष खंडुजी काकडे, कार्यक्रम प्रमुख संभाजी येळवंडे यांनी दिली.
तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात मंगळवारी पहाटे श्रींच्या अभिषेकाने या सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे. सामुदायिक विवाह सोहळा उपक्रमांचे हे १३ वे वर्ष आहे. सकाळी ११ वाजता साखरपुडा, दुपारी १२ ते ३ पर्यंत भोजन समारंभ, दुपारी १.३० वाजता हळदी समारंभ, दुपारी ३ ते ५ नवरदेवाची भव्य मिरवणूक व सायंकाळी ५.३० वाजता लग्न सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान या सोहळ्यानिमित्त सकाळी ९ ते १ पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी हभप नितीन महाराज काकडे, मंगल महाराज जगताप, तुषार महाराज दळवी, दत्तात्रय महाराज टेमगिरे, सुदाम महाराज सानप, बाळासाहेब काशीद उपस्थित राहणार आहेत.
तसेच यावेळी माजी राज्यमंत्री मदन बाफना, संजय (बाळा) भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, माऊली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, विठ्ठलराव शिंदे, गणेश खांडगे, बाळासाहेब नेवाळे, गणेशआप्पा ढोरे, भास्करराव म्हाळसकर, सभापती सुभाषराव जाधव, जिल्हा परिषद सभापती दीपाली हुलावळे, पंचायत समिती सभापती सुनीता येवले, उपसभापती साहेबराव कारके, नगराध्यक्ष अबोली ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे आदी उपस्थित राहणार आहेत.
लग्न समारंभ पूर्वी होणारी नवरदेवाची मिरवणूक या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या हजारो वऱ्हाडी मंडळींना बसण्यासाठी भव्य मंडप तसेच भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना संपूर्ण पोशाख, संसारपयोगी भांडी, वधूला चांदीचे अलंकार, मनगटी घड्याळ देण्यात येणार आहे. सामुदायिक विवाह सोहळा समितीचे पदाधिकारी सुधीर ढोरे, कार्तिक यादव, अक्षय बेल्हेकर, गणेश झरेकर, केदार बवरे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी नियोजन करत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संयुक्त संघटनेने घेतली आमदार सुनील शेळके यांची भेट
– मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर
– जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील ‘या’ भागात होणार सायकल स्पर्धा