Dainik Maval News : बेदरकार वाहतूकीचा सर्वसामान्य नागरीकांना होणारा त्रास दिवसेंदिवस वाढतच असून दुर्दैवाने वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे निष्कारण अपघात होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. काल ( दि. 1 ) हिंजवडी परिसरातील पंचरत्न चौकात कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बसने काही जणांना चिरडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला.
आयटी हब हिंजवडी येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव बसचे नियंत्रण सुटल्याने ती थेट फुटपाथवर चढली. या अपघातात फुटपाथवरून चालणाऱ्या दोन लहानग्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अर्चना देवा प्रसाद (वय ८) आणि सूरज देवा प्रसाद (वय ६) अशी अपघातात मरण पावलेल्या लहानग्यांची नावे आहेत. तर या अपघातात प्रिया देवा प्रसाद (वय १८) ही तरुणी गंभीर जखमी झाली असून अविनाश चव्हाण या पादचारी व्यक्तीसह बसमधील काही प्रवासीही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
बेदरकार वाहतूकीचा सर्वसामान्य नागरीकांना होणारा त्रास दिवसेंदिवस वाढतच असून दुर्दैवाने वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे निष्कारण अपघात होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. काल हिंजवडी परिसरातील पंचरत्न चौकात कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बसने काही जणांना चिरडल्याची घटना…
— Supriya Sule (@supriya_sule) December 2, 2025
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा निकाल

