Dainik Maval News : पावसामुळे बाधित झालेल्या भातशेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत महाविकासआघाडी मावळ तालुका यांच्या वतीने तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
मागील ४ ते ५ दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे भातशेती आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक देखील पावसामुळे काढता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. मावळ तालुक्यात भात पीक हे बहुतांश शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख पीक आहे.
अवकाळी पावसामुळे भात पिकाच्या काढणीच्या कामाला खीळ बसली असून शेतकऱ्यांसमोर भात पिके कशी काढायची, याची चिंता आहे. हंगामाच्या सुरुवातीला पेरणी उशीरा झाली, तीही कमी प्रमाणात आली. आता जेवढी भातशेती केली होती त्यामध्ये काही भातांना अजून भात आले नाही, जे आले ते पावसामुळे पडले व पिके पाण्यात आहेत.
भाताचे पिके हातचे गेल्यामुळे अपोआपच पशुधनासाठी लागणारा चारा आणि तांदुळ हाती येणार नाही. शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक दिवस पाऊस पडत असल्याने मावळ मधील शेतकऱ्यांचे भात पिकांचे अतोनात नुकसाना झाले असून त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी महाविकासआघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना देत शासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास पुढील ८ दिवसात मोठ्या स्वरूपात आंदोलन महाविकासआघाडीच्या काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उ.भा.ठा), मनसे, वंचित आघाडी पक्षाच्या वतीने करण्यात येईल असा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ठरलं तर… मावळ तालुक्यात ‘हे’ 5 पक्ष ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
– राज्यावर पुन्हा पावसाचे सावट; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती, मावळातील भातउत्पादक शेतकरी चिंतेत
– दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार ; मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर
