Dainik Maval News : आंदर मावळ विभागातील राजपुरी ते बेलज रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. शाळकरी विद्यार्थी, दुग्ध व्यवसायिक, शेतकरी, महिला – पुरुष कामगार वर्ग, व्यावसायिक सर्वांनाच ह्या खराब रस्त्याचा सामना करावा लागतो आहे. अलीकडे या परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने हा रस्ता होणे आवश्यक आहे.
बेलज – राजपुरी रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे स्थानिक नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. परिसरातील गाव, वाडी वस्तीवरील विद्यार्थी, दुग्ध व्यवसायिक, कामगार व नागरिकांना दररोज याच रस्त्यावरुन ये-जा करावी लागते. परंतु रहदारीचा हा प्रमुख खड्डेमय झाल्याने दररोजच्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महत्वाचे म्हणजे परिसरातील युवक, कामगार वर्ग मोठ्या संख्येने दररोज याच रस्त्याने तळेगाव, आंबी, नवलाख उंबरे, चाकण अशा एमआयडीसीच्या ठिकाणी कामाला जात असतात. त्यांना दररोज खराब रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. टाकवे ते बेजल ते राजपुरी रस्त्यावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. हा रस्ता खराब होण्यासाठी अवजड वाहनेही बऱ्यापैकी कारणीभूत आहेत.
आंदर मावळातील हा परिसर मोठा निसर्गरम्य आहे. येथील आंध्रा धरणातून वेगवेगळ्या भागात पाणी सोडले जाते. जलाशय व सभोवतालचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक इथे येत असतात. परंतु पर्यटकांना इथपर्यंत घेऊन येणारा रस्ता खराब असल्याने त्याचा पर्यटन व व्यवसायावर परिणाम होत आहे. यामुळे हा रस्ता लवकर दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ई-हक्क प्रणाली : वारस नोंद, 7/12 वरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे यासाठी आता घरबसल्या जमा करा कागदपत्रे
– नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई ; थेट खात्यात जमा होणार रक्कम
– HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड