Dainik Maval News : मावळ विकास मंडळ संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन आजिवली-जवण आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. एक तपाहून अधिक काळ हा उपक्रम अतिदुर्गम भागातील महिलांसाठी राबविला जात आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मंचच्या अध्यक्ष स्नेहल बाळसराफ यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील महिलांना संधी देण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये प्रामुख्याने संगितखूर्ची, पाककला, उखाण स्पर्धा घेतल्या जात असून पवनमावळ परिसरातील बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला.
- महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी सार्वजनिक हळदीकुंकु समारंभातून महिलांचे संघटन करुन त्यांना विविध विषयांवर प्रबोधन करणे हा या उपक्रमांचा मानस आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पिंपरी-चिंचवड परिसरातील सुप्रसिध्द योगप्रशिक्षक व वैद्यकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या शुभागी जयप्रकाश गिरमे यांना निमंत्रित केले होते.
सार्वजनिक हळदीकुंकु या कार्यक्रमामुळे महिला संघटित होतात आणि स्वतःबरोबर समाजाची देखील विचार करतात हे फार महत्वाचे पाऊल आहे, असे शुभांगी जयप्रकाश गिरमे यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच आशा भिकोले यांच्या माध्यामातून हळदीकुंकु समारंभातील विविध स्पर्धांची बक्षीसे प्रायोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रमेश अरगडे यांनी केले. आभारप्रदर्शन रोहिणी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व सुत्रसंचालन वर्षा बारबोले यांनी केले. तर शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनींनी विशेष प्रयत्न केले.
स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे;
संगीत खुर्ची
1. शीतल अमी टेमघरे
2. निर्मला संदीप शिंदे
3. मनिषा संतोष घरदाळे
पाककला स्पर्धा
1. रेखा पवन केला
2. ज्योती संदीप शिर्के
3. लक्ष्मी प्रेम पाटील
उखाणे स्पर्धा
1. शीतल अमी टेमघरे
2. सायली पांडुरंग मारणे
3. संध्या गौरव शिंदे
लकी ड्रॉ
1. कमल भाऊ ओव्हाळ – पैठणी
2. संगिता शिवाजी चव्हाण- नथ
3. रत्नमाला अर्जुन लायगुडे- जोडवी
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
– पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड

