व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कुस्तीगीर तालिम संघ-पुणे यांच्या वतीने कोंढवा बुद्रुक येथे नुकतीच पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 27, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Seven wrestlers from Maval taluka won medals in Pune District Selection Test Wrestling Tournament

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कुस्तीगीर तालिम संघ-पुणे यांच्या वतीने कोंढवा बुद्रुक येथे नुकतीच पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मावळ तालुक्यातील सात मल्लांनी पदके पटकावली आहे. यामध्ये साई चांदेकर, धिरज शिंदे यांनी सुवर्णपदक तर ओम पवार, स्वराज बोडके, सतिश मालपोटे, केतन घारे व प्रतिक देशमुख यांनी आपापल्या वजनी रौप्यपदक पटकावले आहे. सतिश मालपोटे, केतन घारे व प्रतिक देशमुख यांची अहिल्यादेवी नगरला होणाऱ्या ६७ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

बालगटातील ४८ किलो वजनी गटात आढले येथील साई बाळू चांदेकर तर ५१ किलो वजनी गटात उर्से येथील धिरज मारुती शिंदे यांनी सुवर्णपदक असुन, काले पवनानगर येथील ओम दिपक पवार याने ३२ किलो तसेच गहुंजे येथील स्वराज शेखर बोडके याने ३६ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे.

त्याचप्रमाणे वरिष्ठ गादी विभागात फळणे येथील सतिश रघुनाथ मालपोटे याने ५७ किलो सडवली येथील केतन नथु घारे याने ७९ किलो तर प्रतिक शंकर देशमुख याने मानाच्या महाराष्ट्र केसरी (८६ ते १२५ किलो) वजनी गटात रौप्यपदक पटकावले असून, सतिश मालपोटे, केतन घारे व प्रतिक देशमुख यांची २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अहिल्यादेवी नगरला होणाऱ्या ६७ व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच बालगटातील साई चांदेकर व धिरज शिंदे यांची मे महिन्यात होणाऱ्या पहिल्या बालगट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सर्व विजेत्या मल्लांचे मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे आश्रयदाते व अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै.चंद्रकांत सातकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष व ऑलंम्पिकवीर कुस्तीगीर पै.मारूती आडकर, राष्ट्रीय कुस्तीगीर पै. संभाजी राक्षे, अध्यक्ष पै.खंडू वाळूंज, सचिव व राष्ट्रीय कुस्तीगीर पै.बंडू येवले, उपाध्यक्ष व विद्यापीठ चॅम्पियन पै.सचिन घोटकुले, पै.मनोज येवले, राष्ट्रीय कुस्तीगीर व कार्याध्यक्ष पै.नागेश राक्षे, सहसचिव व महाराष्ट्र चॅम्पियन ॲड. पै.पप्पु कालेकर, राष्ट्रीय कुस्तीगीर पै. भरत लिमण, पै .निवृत्ती काकडे, महाराष्ट्र चॅम्पियन पै. तानाजी कारके, पै.विष्णु शिरसाट, पै. विश्वास वाघोले, पै. ऋषिनाथ शिंदे, पै.धोंडिबा आडकर, पै. सुरेश आगळमे, पै. नारायण आडकर, पै. किशोर सातकर, पै.बाळासाहेब काकरे, पै.चंद्रकांत शिंदे, पै.बाळू वाळूंज, पै.अंकुश काकरे, पै. नवनाथ बोडके, पै. दिपक दाभाडे, संघाचे सल्लागार पै. राजु बच्चे, पै.देविदास कडू यांनी अभिनंदन केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
– महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी
– महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी


dainik maval jahirat

Previous Post

दिव्यांग कलाकारांनी जिंकली रायगडकरांची मने – पाहा व्हिडिओ

Next Post

ओवळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रेणुका वाटाणे यांची बिनविरोध निवड । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Renuka Vatane was elected unopposed deputy sarpanch of Owle Gram Panchayat Maval

ओवळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रेणुका वाटाणे यांची बिनविरोध निवड । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.