व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

मावळ तालुक्यात पावसाचे अनियमित आणि अपुरे प्रमाण यामुळे यावर्षी तालुक्यातील मुख्य पीक असलेले भातपीक करपू लागले असून, इतर पिकांचेही नुकसान होत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 10, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात पावसाचे अनियमित आणि अपुरे प्रमाण यामुळे यावर्षी तालुक्यातील मुख्य पीक असलेले भातपीक करपू लागले असून, इतर पिकांचेही नुकसान होत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध सवलती व लाभ येथील शेतकऱ्यांनाही मिळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

मावळ तालुक्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण अनियमित राहिल्याने भातपिकाला मोठा फटका बसत आहे. शेतातील भातरोपे पाण्याअभावी करपू व वाळू लागली आहेत. भात हे तालुक्यातील प्रमुख पीक असल्याने त्याचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इतर पिकांनाही पावसाच्या कमतरतेचा फटका बसत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

सध्याची शेतीची परिस्थिती, पिकांचे होणारे नुकसान आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. मावळ तालुक्यातील शेतीच्या परिस्थितीची पाहणी करून वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. तसेच तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाकडून विविध सवलती आणि मदतीचे लाभ दिले जातात. त्याच धर्तीवर मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनाही आवश्यक मदत मिळावी. पावसाअभावी होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

प्रशासन या मागणीची दखल घेऊन शासनाकडे कोणती भूमिका मांडते आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले
– “स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम
– मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली


dainik maval jahirat

Previous Post

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.