Dainik Maval News : केंद्र सरकारने आज (दि. २५ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पुरस्कारांमध्ये विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
- राष्ट्रपतींनी एकूण 139 पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात एक पुरस्कार हा विभागून अर्थात जोडीला देण्यात आला आहे. एकूण 7 मान्यवरांना पद्मविभूषण, 19 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 14 जणांचा समावेश आहेत. महाराष्ट्रातील 3 जणांवा पद्मभूषण आणि 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पद्म पुरस्कार जाहीर झालेले महाराष्ट्रातील पुरस्कारार्थी
पद्मभूषण – 3
1. मनोहर जोशी (मरणोत्तर)
2. पंकज उदास (मरणोत्तर)
3. शेखर कपूर
पद्मश्री – 11
1. अच्युत रामचंद्र पालव
2. अरुंधती भट्टाचार्य
3. अशोक सराफ
4. अश्विनी भिडे
5. चित्राम पवार
6. जसपिंदर नरुला
7. मारूती चितमपल्ली
8. रनेंद्र भानू मुजुमदार
9. सुभाष शर्मा
10. वासुदेव कामत
11. विलास डांगरे
For the year 2025, the President has approved conferment of 139 Padma Awards including 1 duo case (in a duo case, the Award is counted as one) as per list below. The list comprises 7 Padma Vibhushan, 19 Padma Bhushan and 113 Padma Shri Awards.
Late folk singer Sharda Sinha… pic.twitter.com/vxf5SL3ny6
— ANI (@ANI) January 25, 2025
दरम्यान, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारामध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचा समावेश असतो. या पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येत असते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे