व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke

आमदार सुनिल शेळके म्हणाले की, आगामी कॅबिनेटच्या बैठकीत तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाच्या मसुद्याला तत्काळ मंजुरी द्यावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 25, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : प्रस्तावित तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी च्या कामाच्या मसुदा एमएसआयडीसीकडून महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांमार्फत मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्याविषयी मावळचे आमदार सुनिल शेळके, खेडचे आमदार बाबाजी काळे आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२२) महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे (एमएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांची एमएसआयडीसीच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

  • बैठकीत एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित म्हणाले की, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचे प्रस्तावित कामासाठी राज्य शासनाने वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी, यासांदर्भात एमएसआयडीसीकडून गेल्या १ जानेवारी रोजी प्रारुप मसुदा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याला महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित भूसंपादन आणि निविदा कार्यवाही वेगाने सुरु करण्यात येईल.

आमदार सुनिल शेळके म्हणाले की, आगामी कॅबिनेटच्या बैठकीत तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाच्या मसुद्याला तत्काळ मंजुरी द्यावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे. कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी आहे, असे शेळके यांनी सांगितले.

सध्या होत असलेल्या वाहतूक कोंडीवर तत्काळ उपाययोजना करण्याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी दीक्षित यांना विचारले असता, ऑन रेकॉर्ड हा रस्ता भारतीय राजमार्ग प्राधिकरणकडेच आहे. कॅबिनेट मंजुरीनंतर निधी उपलब्ध होताच वाहतूक कोंडीवर उपायोजना केल्या जातील, असे दीक्षित यांनी सांगितले.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, उपाध्यक्ष दिलीप डोळस, सचिव अमित प्रभावळकर, सदस्य संजय चव्हाण, प्रमोद दाभाडे आणि मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.

मसुद्यामध्ये काय काय मुद्दे ?
1. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि प्रस्तावित पुणे-संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग-७५३ ला जोडणारा ५३ किमीचा तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग हा पुणे शहराकरिता बाह्यवळण मार्ग म्हणून उपयोगी पडणारा आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या असल्याने वाहनांना बराच काळ लागतो. सदर दुपदरी मार्गाचे चार पदरी उन्नत मार्गात बांधकाम करण्यासह आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने केले आहे. त्यासाठी आवश्यक एकूण रुपये साडेसहा हजार कोटीचा निधी पथकर गुंतवणुकीच्या द्वारे ई.पी.सी. तत्त्वावर विकसित करणेबाबत किंवा अथवा बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बी.ओ.टी,) तत्त्वावर आवश्यक निविदा कार्यवाही उद्योजक म्हणून एमएसआयडीसी मार्फत करण्यात यावी.

2. प्रस्तावित तळेगाव-चाकण-शिक्रापूर चार पदरी उन्नत मार्ग आणि सध्याच्या अस्तित्वातील दोन पदरी रस्त्याचे उड्डाणपूल बांधकामाचे उद्योजक म्हणून एमएसआयडीसी मार्फत पथकर प्रणालीद्वारे करण्यास मंजुरी देणे. भारतीय राजमार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनात तात्काळ सामंजस्य करार करुन ३० वर्षांसाठी सवलत कारनामा करुन सर्वसामावेशक कार्यकारी समिती गठीत करावी. केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या पथकर धोरणांनुसार एमएसआयडीसीमार्फत पथकर लावून या रस्त्याची सुधारणा करण्यास मान्यता द्यावी.

3. आर्थिकदृष्ट्या सुसाध्य करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी आणि सदर कामासाठी ४१ हेक्टर भूसंपादनासाठी १० कोटीं प्रति हेक्टर असा एकूण ४१० कोटींचा निधी उपलब्ध करुन दयावा. सदर मार्ग हरित मार्ग म्हणून विकसित करून त्याद्वारे कार्बन क्रेडिट प्राप्त करुन आर्थिक सुधारणा सुलभता एमएसआयडीसीने तपासावी. या रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरु होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने वेळोवेळी आवश्यक ती पावले उचलावीत आदी बाबी या मसुद्यात मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे


Previous Post

आमदार सुनिल शेळके यांच्या जनसंवाद यात्रेला वडगावकरांचा प्रतिसाद, नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा । Vadgaon Maval

Next Post

केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Central Govt Announced Padma Awards 2025 on eve of Republic Day president droupadi murmu marathi News

केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Panchayat Samiti Chairperson Sunita Yewle elected as member of committee of Pune Zilla Parishad

मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता मनोज येवले यांची पुणे जिल्हा परिषदेच्या ‘या’ महत्वाच्या समितीच्या सदस्यपदी निवड

April 19, 2026
MP Shrirang Barne will review the development works in Maval taluka on Monday

खासदार श्रीरंग बारणे सोमवारी मावळ तालुक्यातील विकासकामांचा घेणार आढावा

April 19, 2026
Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.