देशातील सार्वत्रिक निवडणूकांसाठी अद्याप 8 ते 9 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. असे असले तरीही देशातील सर्वच महत्वाचे राजकीय पक्ष हे ऑन इलेक्शन मोडवर असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी भाजपाने तर वर्षभरापासूनच लोकसभेची तयारी सुरु केली आहे. अशात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस (आय) पक्षाच्या गोटात अद्याप शांतता होती. मात्र आता काँग्रेस देखील एक्टिव्ह झालेली असून राज्यात काँग्रेस (आय) पक्षाने लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. ( Congress High Command Appointed Praniti Shinde As Observer For Pune And Maval Lok Sabha Constituency )
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून रणनीती आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एकीकडे काँग्रेस प्रणित इंडिया ही आघाडी बळकट होत असताना, आता प्रत्यक्षात काँग्रेस देखील लोकसभेच्या अनुषंगाने कामाला लागली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीने महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघांसाठी एक ‘यंग ब्रिगेड’ रेडी केली असून त्यांच्यावर काही लोकसभा मतदारसंघाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यातही शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ असणारे मतदारसंघ सदर यंग ब्रिगेडकडे देण्यात आले आहेत.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व 48 मतदारसंघात पक्षनिरीक्षक आणि त्यांना मदतनीस देण्यात आले आहेत. खरेतर काँग्रेस हा राज्यात महाविकास आघाडीचा सध्याचा सर्वात मोठा घटक पक्ष आहे. मात्र, आता राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने निरीक्षक नेमल्याने महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र निवडणूक लढविणार की स्वतंत्रपणे? याची चर्चा रंगली आहे. ( Congress High Command Appointed Praniti Shinde As Observer For Pune And Maval Lok Sabha Constituency )
मावळ लोकसभेची जबाबदारी प्रणिती शिंदेंवर…
नुकत्याच झालेल्या तेलगंणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर जबाबदारी असलेल्या सर्व मतदारसंघात काँग्रेसने घवघवीत यश मिळवले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावर पुणे व मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या शिफारसीनुसार 2024 च्या लोकसभा निवडणूक संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांची पुणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाकारिता पक्षाच्या मुख्य निरीक्षक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती; तळेगाव शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा
– मावळात तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीजेची लाईन पडून मृत्यू; महावितरणच्या गलथान कारभाराचा आणखीन एक बळी
– महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडसाठी आतापर्यंत 125 एकराचा ताबा, जमीन मालकांना 250 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road