तळेगाव स्टेशन येथील स्त्रीशक्ती भाजी मंडई कडून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले पुणे जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांचा सत्कार करण्यात आला. स्त्रीशक्ती भाजी मार्केटच्या वतीने रामदास काकडे यांच्या नेतृत्वाखाली भाजी मार्केट कमिटी सदस्यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेमध्ये रामदास काकडे यांनी भाजी विक्रेत्या बांधवांना मार्गदर्शन केले.
स्वर्गीय किशोर भाऊ आवारे यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच त्यांचे कार्याला वंदन करून भाजी मार्केट कमिटीने सभेला शुभारंभ केला गेला. दर महिन्यातील शेवटच्या शनिवारी अडीअडचणी सोडवण्यासाठी रामदास काकडे यांच्या नेतृत्वाखाली सभेचे आयोजन करणार असल्याचे नमूद केले. श्री शक्ती भाजी मंडई तळेगाव स्टेशन या ठिकाणी रामदास काकडे यांनी मार्केटची भेट घेतली. तेव्हा सर्व भाजी विक्रेते महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्केट विषयी होणाऱ्या अडचणी त्यांनी रामदास काकडे यांच्या समोर मांडल्या. ( Congress leader Ramdas Kakade was felicitated at Talegaon Dabhade )
या सर्व अडचणी जाणून घेऊन येणाऱ्या आठवड्यामध्ये त्या अडचणी दूर करण्यात येतील असे रामदास काकडे यांनी यावेळी आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे निमित्ताने महिला स्त्री शक्ती भाजी मार्केट च्या अध्यक्षा तसेच तळेगाव स्टेशन काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संगीत दूबे, भाजी मार्केटच्या उपाध्यक्ष संगीता मराठे तसेच सर्व सदस्य त्याचप्रमाणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे व सुनील पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
रामदास काकडे सध्या काँग्रेसमध्ये….
तळेगाव दाभाडे शहराचे माजी उपनगराध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक रामदास काकडे यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. कान्हे येथील पक्ष कार्यालयात काकडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, माजी तालुकाध्यक्ष ॲड. दिलीप ढमाले, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, रोहिदास वाळुंज आदी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन, पुण्यात होणार अंत्यसंस्कार, मोदींकडून शोक व्यक्त
– मोठी बातमी! ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन