Dainik Maval News : राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काँग्रेस (आय) पक्ष आज राज्यभर आंदोलन करणार आहे. आजपासून (दि.3) राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी तालुकास्तरावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन काँग्रेस (आय) पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाकडून मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर ते तहसील कार्यालय पर्यंत पायी मोर्चा काढून प्रशासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मागण्यांचे निवेदन देणार असल्याची माहिती काँग्रेस (आय) तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी दिली. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही मोहोळ यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 40 कोटीची पाणीपुरवठा योजना, 7.5 कोटीचे शॉपिंग सेंटर, संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे – वाचा वडगाव नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
– लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीतील 5 पानटपऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; विद्यार्थ्यांना पानामधून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा संशय
– अजित पवारांच्या मावळातील पदाधिकाऱ्याचे कृत्य ; जन्मदात्रीला केली मारहाण, आईने माध्यमांसमोर येत केले पितळ उघडे