Dainik Maval News : वडगाव मावळ पंचायत समिती कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्ताने वाचनातून आदरांजली वाहिली आहे. तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सलग बारा तास वाचन करून अनोख्या पद्धतीने महापुरुषांना अभिवादन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती मावळ येथे शासकीय कर्मचाऱ्यांचा बारा तास महावाचन हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमामध्ये सुमारे दीडशेहून अधिक शासकीय कर्मचारी व शिक्षक सहभागी झाले होते.
- सकाळी सहा ते सायंकाळी सहा या बारा तासांच्या काळात त्यांनी साहित्य, कला, विज्ञान तसेच महापुरुषांच्या चरित्र विषयक पुस्तकांचे वाचन करण्यात आले. यावेळी आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ज्ञानदान पेटीचे उद्घाटन करण्यात आले. बारा तास वाचन झाल्यानंतर प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, कृषी अधिकारी संताजी जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, नाना शेळकंदे, निर्मला काळे इ. मान्यवर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी निवडणूक । Sant Tukaram Sugar Factory Election
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा हद्दीत विचित्र अपघात, महिलेचा मृत्यू । Accident On Mumbai Pune Expressway
– वीटभट्टीवरील मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप ; सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून महामानवाला अभिवादन । Maval News