पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 14 मे) वाराणसीतून तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार केला. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन आता टीका केली जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेशी घट्ट असलेल्या जिरेटोप विषयी काही संकेतही आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मर्जी राखण्यासाठी त्यांना जिरेटोप घातल्याबद्दल शिवभक्तांमधून प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 14 मे) वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षांचे प्रमुख नेते तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल पटेल उपस्थित होते. मोदींनी अर्ज दाखल केल्यानंतर सर्व नेत्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला. हा व्हिडिओ सोशलवर व्हायरल होताच त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ( Controversy Over Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On PM Narendra Modi NCP Praful Patel )
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही जिरेटोप परिधान करू नये, असा संकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय करतानाही संपूर्ण वेशभूषा परिधान केल्यानंतर जिरेटोप परिधान करण्याचा प्रघात आहे. पंतप्रधान मोदी हे छत्रपती नाहीत. केवळ छत्रपती हा जिरेटोप परिधान करू शकतात. जिरेटोपाचा अवमान करण्यात येऊ नये,’ असा इशारा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी दिला आहे.
अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आता याप्रकरणी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालण्याचं प्रफुल्ल पटेल यांचं धाडस कसं झालं. उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का? असा संतप्त सवाल आनंद दवे यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘आपण काय करत आहोत, हे प्रत्येकाला कळायला हवे’ अशी प्रतिक्रिया दिली. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी मात्र याविषयी सारवासारव केली आहे. ‘जिरेटोपावरून राजकारण करू नये, ज्यांनी जिरेटोप घातला त्या पंतप्रधानांचा यात काय दोष?’, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले. तर ‘प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना जिरेटोप घातला त्यात मोदींचा काय दोष?’ असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया –
अधिक वाचा –
– शिलाटणे येथे वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांची तारांबळ, कार्ल्यात चारचाकी वाहनाचे झाले नुकसान
– नायगावमधील युवकाचा कामशेत येथे इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू, परिसरात पसरली शोककळा । Maval News
– पुणे जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत मतदान ! वाचा विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी । Pune News