Dainik Maval News : स्वत:ला मूल होत नसल्याने दाम्पत्याने गर्भवती महिलेला पैसे दिले. खोटे नाव सांगून तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दत्तक प्रक्रिया न करता तिच्याकडून बाळ घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. देहूरोड येथे 28 फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नी आणि अन्य एका संशयित महिलेवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एका महिलेने शुक्रवारी (दि.२८ फेब्रुवारी) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोडप्याला मूल होत नाही म्हणून त्यांनी एका महिलेच्या ओळखीने गर्भवती महिलेला पैसे दिले. त्यानंतर तिला देहूरोड कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी गर्भवती महिलेची खरी ओळख लपवून तिला मूल होत नसलेल्या महिलेचे नाव दिले. त्यानंतर बालकाची खोटी माहिती जन्म नोंदणीच्या घोषणापत्रामध्ये दिली.
बालकाची दत्तक प्रक्रियेबाबत कोणतीही शासकीय नोंद न करता शासनाची दिशाभूल केली. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे बालकाची खोटी माहिती देऊन बालकाचा जन्माचा दाखला प्राप्त केला. कॅन्टोन्मेंट रुग्णालय प्रशासनाची फसवणूक करून बालक स्वत:चे आहे असे भासवून संबंधित महिलेला बाळाचे पैसे देऊन ते खरेदी करून स्व:च्या ताब्यात ठेवून घेतले, असे फिर्यादीत असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 40 कोटीची पाणीपुरवठा योजना, 7.5 कोटीचे शॉपिंग सेंटर, संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे – वाचा वडगाव नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
– लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीतील 5 पानटपऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; विद्यार्थ्यांना पानामधून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा संशय
– अजित पवारांच्या मावळातील पदाधिकाऱ्याचे कृत्य ; जन्मदात्रीला केली मारहाण, आईने माध्यमांसमोर येत केले पितळ उघडे