भारताचा स्टार विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत याच्या कारला मोठा अपघात झाला आहे. दिल्ली-डेहराडून महामार्गावर झालेल्या कार अपघातातून तो बचावला आहे. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला त्वरीत दिल्लीला नेण्यात आले आहे. ( Cricketer Rishabh Pant Car Accident In Uttarakhand Cm Instructed Officials To Ensure All Possible Arrangements )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हरिद्वार जिल्ह्यामध्ये हा अपघात झाल्यानंतर पंतला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्याच्यावर रुरकी प्रशासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 58 वर हा अपघात झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक स्वपन किशोर यांनी दिली. हम्मदपुर झाल येथील एका वळणावर भरधाव वेगात असलेल्या ऋषभ पंतच्या कारचा अपघात झाला.
भीषण अपघातीच माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि खानपुरचे आमदार उमेश कुमार हेदेखील रुग्णालयात पोहचले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पंतची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतच्या अपघातानंतर अधिकाऱ्यांना त्याच्या उपचारासाठी सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश दिलेत.
अधिक वाचा –
– फुटबॉल जगतातील तारा निखळला! महान खेळाडू पेले यांचे निधन, जगभरातील चाहत्यांवर शोककळा
– “महाराष्ट्र सरकारनेही राज्यात जातनिहाय जनगणना करावी..!”