Dainik Maval News : खरीप हंगामातील पिकांसाठी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेती विकास सोसायट्यांच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी दिली.
मावळ तालुका हा खरीप पिकासाठी अग्रेसर तालुका आहे. तालुक्यात एकूण 13 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप भात पीक आणि 3 हजार हेक्टर क्षेत्रात इतर खरीप पिके घेतली जातात.
मावळात खरीप भात पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेती विकास सोसायट्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात अर्थ सहाय्य दिले जाते. हे कर्ज वाटप 1 एप्रिल पासून तालुक्यात सुरू करण्यात आलेले आहे.
तालुक्यात एकूण 55 शेती विकास सोसायट्या असून या सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी कर्ज वाटप केले जाते. यावर्षी 1 एप्रिल पासून आतापर्यंत 3 हजार 460 शेतकऱ्यांना 28 कोटी 8 लाख रुपये कर्जाचे वाटप झाले असल्याचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मावळ तालुका विभागीय अधिकारी गुलाबराव खांदवे यांनी सांगितले.
मावळ तालुक्यात खरीप भात पीकासाठी 50 कोटी रुपयांचे कर्जवाटप करणार असून या आर्थिक वर्षात शेतीबरोबरच शेतीपूरक कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मधमाशी पालन, पॉलिहाऊस, फुल शेती तसेच शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या तरुणांसाठी सुद्धा 50 कोटी रुपये कर्ज वाटप करण्याचा मनोदय आहे, असे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News