Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27 वा गाळप हंगाम नुकताच संपन्न झाला असून यावर्षी कारखान्याने 4 लाख 3 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून केले आहे. यातून 4 लाख 64 हजार 200 पोती साखर उत्पादन झाले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पठारे यांनी दिली.
मावळ, मुळशी, हवेली, खेड आणि शिरूर अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या संत तुकाराम साखर कारखान्यात यंदा 300 गावातील शेतकऱ्यांनी गाळपासाठी 4 लाख 3 हजार मेट्रिक टन ऊस उपलब्ध करून दिला होता. त्यातून 4 लाख 64 हजार 200 पोती साखर उत्पादन झाले आहे.
- कारखान्याचा 27 वा गाळप हंगाम यावर्षी 124 दिवस चालला. 5 तालुक्यामधील एकूण सुमारे 5870 हेक्टर क्षेत्राच्या ऊस लागवडीची नोंद झाली होती. मात्र कारखाना अवघे 124 दिवस चालल्याने गाळपात मोठी घट दिसून आली आहे. गेल्या वर्षी 26 वा गाळप हंगाम हा 51 दिवस चालला होता. यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याकडून 2800 रुपयांचा पहिला हप्ता अदा करण्यात आला असल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले आहे.
साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून 3 कोटी 99 लाख 96 हजार 800 युनिट निर्माण झाले असून त्यापैकी कारखान्याने 2 कोटी 69 लाख 41 हजार 404 युनिट निर्यात केले आहे. तर गाळपातून 11 लाख 23 हजार 15 बल्क लिटर इतके इथेनॉल तयार झाले आहे.
कारखान्याच्या 27 व्या गाळप हंगामाचे नियोजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, मा उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे तसेच सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक साहेबराव पठारे, सचिव मोहन काळोखे, शेतकी अधिकारी स्वप्निल गावडे आदींनी केले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच