भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेख्यांची तपासणीच्या तरतूदीनुसार मावळ, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील पाचव्या मजल्यावरील निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षात खर्च तपासणी करण्यात येईल. ही तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी 3 मे रोजी तर दुसरी 7 मे रोजी तर तिसरी तपासणी 11 मे 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे. ( Daily expenditure verification schedule of candidates of Maval Pune Shirur Lok Sabha constituencies announced )
पुणे लोकसभा मतदारसंघात सभागृह क्रमांक ३, चौथा मजला, बी वींग, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे-411001 येथे खर्च तपासणी करण्यात येणार आहे. पहिली तपासणी 2 मे रोजी, दुसरी तपासणी 6 मे आणि तिसरी तपासणी 10 मे 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. खर्च तपासणी सभागृह क्रमांक 3, चौथा मजला, बी वींग, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे-411001 येथे करण्यात येणार आहे. पहिली तपासणी 3 मे रोजी, दुसरी तपासणी 7 मे आणि तिसरी तपासणी 11 मे 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी कळविले आहे.
अधिक वाचा –
– महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून पवनानगर बाजारपेठ भागात संजोग वाघेरे यांच्या मशाल चिन्हाचा जोरदार प्रचार । Pavananagar
– फक्त बघितलं म्हणून दुचाकीस्वाराच्या डोक्यावर तलवारीने वार, तरूण गंभीर जखमी, तळेगावजवळील धक्कादायक प्रकार!
– पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांची माघार । Pune News