व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान

रेल्वे बोर्डाकडे या प्रस्तावाची पाठवणी फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली असून, प्रकल्प मंजुरीनंतर चार वर्षांत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 26, 2025
in महाराष्ट्र, देश-विदेश
Mumbai Pune railway service Karjat Lonavla ghat Central Railway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यात आता 3 नवे रेल्वे मार्ग विकसित होणार आहेत. मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दिशेने मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रात तीन नवीन रेल्वे मार्ग विकसित केले जाणार असून या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने अन लोणावळा घाटातील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवे रेल्वे मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

  • दरम्यान हे नवे रेल्वे मार्ग विकसित झाल्यानंतर प्रवास वेळेत मोठी कपात होणार असून, मेल-एक्सप्रेस गाड्या आता लोणावळा घाटात न जाता थेट पुण्याला धावणार आहेत. सध्या मुंबई-पुणे दरम्यान 192 किमी अंतर कापण्यासाठी 44 रेल्वेगाड्या धावतात, त्यातील 23 गाड्या दररोज धावणाऱ्या आहेत.

लोणावळा-खंडाळा घाट हा मार्गातील प्रमुख अडथळा असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव येथे मेल-एक्सप्रेस गाड्यांचा वेग ताशी 60 किमी इतकाच मर्यादित ठेवावा लागतो. तसेच, घाटातील चढ-उतारामुळे कर्जत स्थानकात बँकर (अतिरिक्त इंजिन) जोडण्याची आवश्यकता भासते.

यामुळे एकूण प्रवास वेळ वाढतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कर्जत ते तळेगाव, कर्जत ते कामशेत आणि कर्जत ते मळवली हे तीन नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत.

  • या मार्गांवर घाट नसल्याने गाड्या 110 किमी प्रतितास वेगाने धावू शकतील. सरळ मार्गामुळे बँकरची गरज भासणार नाही, तसेच गाड्यांचा वेग वाढल्यामुळे प्रवासात किमान एक तासाची बचत होईल.

रेल्वे बोर्डाकडे या प्रस्तावाची पाठवणी फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली असून, प्रकल्प मंजुरीनंतर चार वर्षांत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. कर्जत ते तळेगाव मार्गासाठी 16 हजार कोटी आणि कर्जत ते कामशेत मार्गासाठी 10,200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई-पुणे प्रवास वेगवान होण्याबरोबरच जादा गाड्या चालविणेही शक्य होणार आहे. एकंदरीत हे तीन कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत या दोन रेल्वे मार्गांसाठी 26,200 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून या मार्गामुळे प्रवाशांना जलद प्रवासाचा अनुभव घेता येईल.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या शिफारशीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर
– ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळ्यातील रस्त्यासाठी खासदार बारणेंचे संरक्षण मंत्र्यांना साकडे । Maval News


Previous Post

मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mumbai Pune missing link project

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.