Dainik Maval News : देहू नगरपंचायत प्रशासनाने पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे बुधवारी हटविली. या कारवाईत २० पेक्षा जास्त दुकाने, टपरी मागे हटविण्यात आली. तर, काही जणांनी स्वतःहून दुकाने मागे हटविली. तर काही ठिकाणी दुकानदार आणि नगरपंचायत कर्मचारी यांच्या किरकोळ वाद झाला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
- काही दिवसांपूर्वीच आमदार सुनील शेळके यांनी देहूमध्ये येत आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी तातडीने पदपथ, रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर नगर पंचायत प्रशासनाने बुधवारी ही कारवाई केली.
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूतून १८ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत अतिक्रमणे काढण्याची मागणी झाली होती. त्यात आमदार शेळके यांनीही नव्या टपरीधारकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
- बुधवारी सकाळी प्रशासनातर्फे देहू मुख्य प्रवेशद्वारापासून कारवाईला सुरुवात झाली. पुढे आंबेडकर चौक ते मुख्य देऊळवाडा या दरम्यान असलेली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली. यावेळी नगरपंचायत प्रशासनाने दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावी, असे आवाहन केले. यास काही जणांनी प्रतिसाद दिला. तर, काहीजण कारवाई रोखण्यासाठी प्रशासनाची वाद घालू लागले.
मात्र, फुटपाथवर दुकाने असल्याने कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी चेतन कोंडे, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेंद्र आंधळे, अभियंता संगपाल गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक प्रिया कदम, रामदास भांगे, कर संकलन प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, पाणीपुरवठा प्रमुख अक्षय रोकडे, महेश वाळके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर, नगरपंचायतचे ३५ कर्मचारी या कारवाईत सहभागी होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– किल्ले लोहगडाकडे जाणारा रस्ता अरूंद आणि धोकादायक ! तातडीने रुंदीकरण, डागडुजी करण्याची मागणी । Lohgad Fort
– मोठी बातमी ! लोणावळासह मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली
– शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर