Dainik Maval News : देहू नगरपंचायतीच्या विविध समित्यांचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. शुक्रवारी समित्यांच्या सभापती व सदस्य पदाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी डॉ. यशवंत माने यांनी कामकाज पाहिले.
सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. दुपारी अडीचपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पार पडली. त्यानंतर पीठासीन अधिकारी यांनी विषय समितीच्या सभापती व सदस्यांची नावे जाहीर केली. नगरपंचायतीचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी चेतन कोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रियांका कदम, रामदास भांगे, महेश वाळके यांच्या उपस्थित निवडणूक प्रक्रिया पार पडली.
समिती आणि निवडलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे ;
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती – सभापती सुधीर काळोखे, सदस्य पूनम काळोखे, योगेश काळोखे, मयूर शिवशरण
बांधकाम समिती – सभापती आदित्य टिळेकर, सदस्य ज्योती टिळेकर, योगेश काळोखे, मयूर शिवशरण
स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती – सभापती उपनगराध्यक्षा प्रियांका मोरे, सदस्य स्मिता चव्हाण, मयूर शिवशरण, योगेश काळोखे
महिला व बालकल्याण विभाग – सभापती रसिका काळोखे, सदस्य स्मिता चव्हाण, शीतल हगवणे, ज्योती टिळेकर
स्थायी समिती – सभापती पदसिद्ध अध्यक्ष नगराध्यक्षा पूजा दिवटे, सदस्य प्रियांका मोरे, रसिका काळोखे, सुधीर काळोखे, आदित्य टिळेकर
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंबी मावळ येथील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन । Maval News
– नाणे मावळातील करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कौशल्या पवार यांची निवड । Maval News
– आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News

