Dainik Maval News : देहू नगर पंचायत प्रशासनाला शासनाकडून यात्रा अनुदान मिळत नसल्याने नगरपंचायतीला नागरिकांच्या मिळकत करातुन पैसे खर्च करावे लागत आहे. देहू नगर पंचायतीला यात्रा अनुदान मिळावे, अशी मागणी शहरवासीय करीत आहे.
देहूत, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा, कार्तिकी एकादशी आणि बीज सोहळा अशा वर्षातून तीन वेळा मोठ्या यात्रा भरतात. या यात्रांसाठी राज्यभरातून लाखो भाविक येत असतात. तर संत तुकाराम महाराज यांच्या दर्शणार्थ प्रतिदिन दहा ते पंधरा हजार भाविक येतात. यात्रेतील भाविकांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेच्या कामांना तात्कालीन ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खर्च केला जात होता.
- देहू परिसरातील वाढती लोकसंख्या आणि 17 सदस्यांची मोठी असणारी ग्रामपंचायतीचे चार वर्षापूर्वी (8 डिसेंबर 2020) नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. आळंदी नगरपरिषदेला प्रतिवर्ष सुमारे दोन कोटी रुपये यात्रा अनुदान मिळत आहे. मात्र चार वर्षांत यात्रेसाठी देहू नगरपंचायतीला एकही रुपया अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे नगरपंचायतीला प्रतिवर्ष यात्रेसाठी नागरिकांच्या मिळकत करातील सुमारे तीन कोटीहून अधिक खर्च करावे लागत आहे.
शासनाने भाविकांच्या सोयी सुविधांसाठी व सुरक्षिततेसाठी नगरपंचायतीला यात्रा अनुदान देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. नगरपंचायतीने शासन दरबारी यात्रा अनुदानासाठी मागणी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत शासनाकडून यात्रा अनुदान मिळालेले नाही. यात्रेतील भाविक आणि वारकरी यांच्या सोयीसुविधाच्या कामासाठी पर्याय नसल्याने नागरिकांच्या मिळकत कराच्या रकमेतून खर्च करावा लागत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक