Dainik Maval News : प्रवासी घेण्यासाठी व सोडविण्यासाठी खासगी बस चालक, ट्रॅव्हल्स चालक कुठेही आपली वाहने थांबवत असतात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो व अपघाताचा धोकाही संभवतो. अशा वाहन चालकांवर व संबंधित वाहन मालकावर कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा वाहतूक विभागाच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी-चिंचवड शहर आणि उपायुक्त वाहतूक विभाग यांच्याकडे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे वाहतूक सेलचे अध्यक्ष विनोद वरखडे यांनी हे निवेदन दिले. यावेळी पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप अवटी उपस्थित होते. निवेदनात असे म्हटले की, पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस व आरटीओ यांनी काही थांबे निश्चित केले आहेत. मात्र बस चालक व ट्रॅव्हल्स चालक प्रवासी घेण्यासाठी कुठेही थांबत आहेत. त्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात होत असून वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
शहरातील नागरिक गावी ये-जा करण्यासाठी प्रामुख्याने खाजगी बस व ट्रॅव्हल्सचा वापर करतात. निगडी, तळवडे, चिखली, भोसरीतून ट्रॅव्हल बस ये-जा करतात. मात्र बस चालक कुठेही आपली वाहने थांबवतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होतात. काही महिन्यापूर्वीच वाहतूक विभागाने बस व ट्रॅव्हल्स पिकअप आणि ड्रॉप निश्चित केले होते, तरीही ट्रॅव्हल्स व बस चालक प्रवासी घेण्यासाठी रस्त्यात कुठेही बस थांबवत असतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– निर्णयाचे ढोल वाजविले… आता पुढे काय ? पुणे – लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्र्रॅकचे काम अद्यापही फायलीत अडकले
– महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ , गतीमान कारभारासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय, जाणून घ्या अधिक
– पाणी पुरवठा योजनांची कामे ठरविलेल्या मुदतेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार