Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेची नवीन इमारत पूर्णत्वास येत असताना मागील आल आठवड्यात इमारतीला आग लागण्याची घटना घडली. इमारत पूर्ण होत असताना कंत्राटदाराच्या गलथानपणामुळे गुरुवारी (दि.6) सायंकाळी अचानक लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे.
नागरिकांच्या कररूपी पैशांचे आणि शासकीय निधीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे करदात्या नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून या घटनेची सखोल चौकशी करावी. तसेच इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधितांवर कारवाई करावी. आगीमुळे इमारतीचे किती नुकसान झाले आणि नुकसानीची भरपाई कोण देणार याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांसमोर जाहीर करावी.
अशी मागणी शाहू, फुले, आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभूळकर आणि सचिव जयंत कदम यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ