एकविरा देवस्थानचे पुजारी यांनी अन्य काही सदस्यांसमवेत आज (बुधवार, 7 सप्टेंबर) रोजी मावळ भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे ( Ravindra Bhegade ) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी, पुरातत्व विभागाकडील एकविरा देवस्थानच्या ऐतिहासिक वस्तू देवस्थानकडे सुपूर्द करण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करून देवस्थानला ऐतिहासिक वस्तू मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली.
यावेळी एकवीरा सेवा प्रतिष्ठानचे मा अध्यक्ष निवृत्ती विठ्ठल देशमुख, एकविरा सेवा प्रतिष्ठानचे मा संचालक शंकर रघुनाथ देशमुख, मावळ भाजपा ( BJP ) किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष सदाशिव गुलाब देशमुख, एकविरा सेवा प्रतिष्ठानचे खजिनदार तथा शिवसेना विभाग प्रमुख भगवान नथू देशमुख, मावळ ( Maval ) भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे, युवा नेते संदीप भेगडे आदी उपस्थित होते. ( Demand For Handing Over Historical Objects Of Ekvira Devasthan From The Archaeology Department )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
मोठी बातमी! राज्यातील तब्बल 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर, वाचा संपूर्ण कार्यक्रम
उद्धव ठाकरेंवर प्रचंड जहरी टीका; “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो..”