व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धामणे, गोडूंबे, दारुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे आणि नेरे येथील प्रस्तावित नगररचना योजना रद्द करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 10, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Demand to DCM Eknath Shinde to cancel proposed tp scheme in Dhamane Godumbe Darumbre Salumbre Sangwade Nere Village

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मावळ विधानसभा मतदारसंघातील धामणे, गोडूंबे, दारुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे आणि मुळशीतील नेरेत प्रस्तावित केलेल्या नगररचना योजनेला येथील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. ग्रामस्थ, शेतकऱ्यांना योजना मान्य नसून याबाबात ग्रामसभेत ठराव झाले आहेत. त्यामुळे ही प्रस्तावित नगररचना योजना तत्काळ रद्द करण्याची मागणी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

खासदार बारणे यांनी उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. त्यांची भेट घेऊन प्रस्तावित नगररचना योजनेला असलेला नागरिकांचा विरोध शिंदे यांना सांगितला. याबाबतचे सविस्तर निवेदन दिले.

खासदार बारणे म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने धामणे, गोडूंबे, दारुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, नेरेत नगररचना योजना प्रस्तावित केली आहे. त्याबाबतची नोटीस प्रसिद्ध केली आहे. परंतु, याला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. नोटीस प्रसिद्ध करण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांशी कोणतीही चर्चा किंवा संमती घेण्यात आली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला दिलेल्या स्थगिती आदेशाचा भंग झाला आहे.

यापूर्वी माण-म्हाळुंगेत २०१६ मध्ये जाहीर केलेली योजना अद्यापही प्रत्यक्षात आली नाही. जमिनींचा ताबा न घेता केवळ कागदोपत्री कारवाई झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना या योजनेवर विश्वास नाही.

एफएसआयचा लाभ मोठ्या बिल्डरांना मिळणार आहे. लहान शेतकऱ्यांना जमिनी विकसित करण्यासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. मोबदला केवळ एफएसआय स्वरुपात देणारी पद्धत बेकायदेशीर व शेतकऱ्यांच्या हक्कांना बाधा आणणारी आहे.

प्राधिकरणाकडे आर्थिक तरतूद नसल्याने योजना वर्षानुवर्षे रखडण्याची शक्यता आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना जमिनीचा उपयोग करता येणार नाही. परिणामी, आर्थिक, सामाजिक,कौंटुंबिक नुकसान होईल. योजनेतील अनेक जमिनी वादग्रस्त आहेत. न्यायालयीन स्थगिती आदेश लागू आहेत. विकासापेक्षा बिल्डर लॉबीच्या लाभासाठी योजना आखली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

ही योजना कोणत्याही परिस्थितीत ग्रामस्थांना मान्य नाही. त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघातील धामणे, गोडूंबे, दारुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे आणि मुळशीतील नेरेत प्रस्तावित केलेली नगररचना योजना तत्काळ रद्द करावी. तसे आदेश तत्काळ देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली. त्यावर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव । Maval Panchayat Samiti
– लोणावळ्यात मनसैनिकांनी कसली कंबर ! नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त शक्तीप्रदर्शन, शेकडोंचा पक्षप्रवेश । Lonavala MNS
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी


Previous Post

महत्वाची बातमी : फटाक्यांच्या दुकानांपासून १०० मीटर परिसरात धूम्रपानास, फटाके वाजविण्यास बंदी

Next Post

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंध आदेश जारी ; सात दिवस आधी परवानगी घेणे बंधनकारक । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Drones

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंध आदेश जारी ; सात दिवस आधी परवानगी घेणे बंधनकारक । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.