तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीला प्रथम नगराध्यक्ष सरसेनापती खंडेराव बाबुराव दाभाडे यांचे नाव द्यावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे यांनी केली आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून प्रथम नगराध्यक्ष सरसेनापती खंडेराव बाबुराव दाभाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही मागणी केली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
यावेळी माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, वृषालीराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे, मुख्याधिकारी एन.के.पाटील, उपमुख्याधिकारी ममता राठोड, कल्याणी लाडे, संतोष दाभाडे-पाटील, सुनील दाभाडे, अशोक दाभाडे, नीलेश दाभाडे, रूपाली दाभाडे, सविता दाभाडे, विजय शहाणे, सिद्धेश्वर महाजन, सुवर्णा काळे, सोनाली सासवडे, रोहित भोसले, प्रवीण माने, आदेश इंगळे, भास्कर वाघमारे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Demand to name building of Talegaon Dabhade Nagar Parishad Sarsenapati Khanderao Dabhade )
सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रवेशद्वाराच्या कमानीचा लोकार्पण सोहळा लवकर करावा, अशी मागणीही सत्येंद्रराजे दाभाडे यांनी केली. माजी नगराध्यक्ष ॲड.रवींद्र दाभाडे यांनी शहराचा नावलौकीक वाढविण्यात सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे मोठे योगदान राहिले असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सरसेनापती दाभाडे घराण्याने तळेगाव, मावळ तालुका व जिल्ह्यासाठी दिलेल्या सामाजिक, आर्थिक योगदानाची विस्तृत माहितीही त्यांनी दिली. भास्कर वाघमारे यांनी स्वागत केले. तर मुख्याधिकारी एन.के.पाटील यांनी आभार मानले.
अधिक वाचा –
– इनरव्हील क्लब तर्फे तळेगाव दाभाडे शहरात 100 विद्यार्थीनींची मोफत नेत्र तपासणी । Talegaon Dabhade
– अंतरिम अर्थसंकल्पात अजित पवारांची मोठी घोषणा! अयोध्या व श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, 1 लाख महिलांना रोजगार देणार । Maharashtra Interim Budget Session
– माळवाडी गावच्या उपसरपंचपदी पूजा मयुर दाभाडे यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election 2024