Dainik Maval News : लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी लोणावळा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 01 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 03 येथील तिकीट घरात अतिरिक्त कॅश काउंटर सुरू करावे, अशी मागणी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
- सध्या या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील तिकीट घरांमध्ये प्रत्येकी एकच कॅश काउंटर कार्यरत आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गर्दीच्या वेळी तिकीट घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात. ही समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक तिकीट घरात दोन कॅश काउंटर आणि एक यूपीआय काउंटर सुरू करावा, अशी प्रवाशांची आणि स्थानिकांची मागणी आहे.
रेल्वे प्रशासनाने हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, यासाठी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने मा. मंडल रेल प्रबंधक (वाणिज्य), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपशहरप्रमुख विशाल पाठारे, सल्लागार पराग राणे आणि विभागप्रमुख प्रसाद कन्नन उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मिसिंग लिंक झाला, आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा प्लॅन ; एमएसआरडीसीकडून सरकारला प्रस्ताव । Mumbai Pune Expressway
– शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पुणे जिल्ह्यातील 146 किमी पाणंद रस्ते मोकळे, मावळमधील 23.8 किमी पाणंद रस्ते मोकळे
– कामाची बातमी : भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, असा चेक करा तुमच्या गावचा नकाशा