Dainik Maval News : मावळ तालुक्यातील नागरिकांना अधिक वेळेवर, सुरक्षित आणि सुटसुटीत सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने तळेगाव दाभाडे बस आगारात नव्याने दाखल झालेल्या पाच एसटी बसगाड्यांचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते रविवारी (दि. 18 मे) संपन्न झाले.
एसटी महामंडळाच्या तळेगाव दाभाडे आगारात पाच नवीन बसगाड्या दाखल झाल्या असून प्रवाशांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. ह्या बस आल्यामुळे तळेगाव दाभाडे, पुणे, मुळशी, आंबेगाव या परिसरातील बऱ्याच प्रवाशांसाठी सुविधा निर्माण झाली आहे, ही समाधानाची बाब आहे.
दरम्यान, कोरोना काळापूर्वी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले पूर्व अशी बससेवा होती. मुंबईला जाण्यासाठी ती सर्वांसाठीच सुविधेची होती. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना या बसमुळे प्रवास सुलभ व्हायचा. फारशी चढ-उतार करण्याची गरज नसायची. ही बससेवा फायद्यात सुरू होती. बस पूर्ण क्षमतेने धावायची. त्यामुळे ही बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश