व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 23, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान । आषाढी वारी 2023

भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने रविवारी (दिनांक 11 जून) पंढरपूरकडे प्रस्थान केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 11, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे
alandi-mauli-palkhi

Photo Courtesy : FB / Chandrakant Patil


‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले…. ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने रविवारी (दिनांक 11 जून) पंढरपूरकडे प्रस्थान केले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

आळंदी येथील समाधी मंदिरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ॲड. विकास ढगे, गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार – आरफळकर आदी उपस्थित होते. ( departure of sant dnyaneshwar maharaj palkhi to pandharpur )

मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

tata tiago ads may 2025

वारकऱ्यांसाठी सुविधा –

आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन, मंदीर संस्थान, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोय, विजेची सोय, वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा, सुलभ शौचालय, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, नदी पात्रात बोटीची व्यवस्था, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनीक्षेपणाद्वारे सूचनाही देण्यात येत आहे.

अधिक वाचा –
– टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान । आषाढी वारी 2023
– “वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक, वारीच्या इतिहासात असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं”


dainik maval ads may 2025

Previous Post

“वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक, वारीच्या इतिहासात असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं”

Next Post

मावळ तालुका कुंभार समाजोन्नती मंडळ युवा आघाडीकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ssc-students-felicitated

मावळ तालुका कुंभार समाजोन्नती मंडळ युवा आघाडीकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Resolution meeting of BJP Andar Maval Vadgaon Kamshet mandal division concluded

भाजपा आंदर मावळ, वडगाव-कामशेत मंडल विभागाची संकल्प सभा संपन्न । Maval BJP

June 23, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरण ४५ टक्के भरले ! लवकरच ओलांडणार पन्नाशी, धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर कायम । Pavana Dam Updates

June 23, 2025
maval-loksabha-ncp-sunil-shelke

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवारी महत्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयाची शक्यता, विरोधकांचेही बैठकीकडे लक्ष

June 22, 2025
162 buildings in Talegaon Dabhade Municipal Council area are dangerous

तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत १६२ इमारती धोकादायक । Talegaon Dabhade

June 22, 2025
Pune-Ring-Road

पुणे रिंगरोडसाठी ‘एमएसआरडीसी’चा मास्टर प्लॅन ; काम रखडल्यास कंपन्यांना ठोठावणार भला मोठ्ठा दंड । Pune Ring Road

June 22, 2025
District Collector Jitendra Dudi reviewed the functioning of Pune District Disaster Management Authority

निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे ३१ जुलैपूर्वी सुरू करावीत – जिल्हाधिकारी

June 22, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.