Dainik Maval News : जे आमदार मावळ मतदारसंघात चार हजार कोटीचा भरीव विकासनिधी आणून मोठा विकास झाल्याचे सांगत आहेत. तेच आमदार विकास बाजूला सोडून मतदारसंघात जनतेला प्रलोभन दाखवित आहेत, अशी टीका अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी केली.
पवन मावळातील परंदवडी, धामणे, पिंपळखुटे, शिवणे, मळवंडी, थूगाव, आर्डव, येलघोल, धनगव्हाण, भडवली, शिवली, कोथुर्णे, वारू, ब्रम्हणोली, ठाकूरसाई, तिकोना पेठ आदी गावांना भेट देत येत्या २० तारखेला पिपाणी चिन्हासमोरील बटण दाबून बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहत औक्षण केले.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दिलीप ढमाले, राष्ट्रवादी काँग्रेचे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, माजी उपसभापती कल्याणी ठाकर, काँग्रेसचे जेष्ठ नेते दिलीप ढमाले, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव वरघडे, नामदेव पोटफोडे, ग्रामस्थ, तरुण, तरुणी, वारकरी संप्रदाय, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बापूसाहेब भेगडे म्हणाले, विद्यमान आमदार यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून, त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. जनतेने त्यांचे खरे व खोटे रुप पाहिलेले असून, जनतेला आता सर्व गोष्टी समजलेल्या आहेत. जे विश्वासघात करतात अशा मंडळीच्या पाठीमागे जनता उभी राहत नाही. आमदार सुनील शेळके नेहमी टिमकी वाजवतात की, मतदारसंघात विकास झाला, चार हजार कोटीचा निधी आणला; परंतु मग त्यांना साड्या, पैसे, विमान प्रवास असे उद्योग का करावे लागतात. पैसे वाटणारे कार्यकर्ते नेमके कोण आहेत, हे तपासले तरी सर्व गोष्टी स्पष्ट होतात.
मावळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्यावर किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झालेले आहे. आचारसंहितेच्या मर्यादा काय असाव्यात याबाबत आमदारांना माहिती असायला पाहिजे. शेळके यांना पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. – संजय उर्फ बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बापूसाहेब भेगडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबन, सुनिल शेळकेंविरोधात बंडखोरी केल्याने कारवाई । Maval News
– आमदार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी हजारो देहूकर उतरले रस्त्यावर । MLA Sunil Shelke
– सोसायट्यांमधील रहिवाश्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रयत्नशील – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade