ग्रुप ग्रामपंचायत कान्हे येथील आंबेवाडी मध्ये बहुउद्देशीय सभागृह, तळे सुशोभीकरण आणि शिवस्मारक पुतळ्याचे भूमिपूजन आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते (दि. 12) करण्यात आले. महाराष्ट्राची अस्मिता आणि गर्व असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वरूढ पुतळ्याचे शिवस्मारक, तलावाच्या 20 गुंठे जागेमध्ये सुशोभीकरण अशा सर्व विकासकामांचे भूमिपूजन कान्हे गावामध्ये करण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
तसेच, कान्हे ग्रामस्थांच्या मागणीनुसार भविष्यकाळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी असे सभागृह, जीम, महिला योगा सेंटर आणि सार्वत्रिक कार्यक्रमांच्या उद्देशाने 350 ते 400 लोक बसतील अशा प्रशस्त हॉलचे महिलांना प्रशिक्षणासाठी, इतर सर्व प्रकारचे ट्रेनिंगसाठी, विवाह सोहळा आणि वाढदिवसाच्या सार्वजनिक वापरासाठी एक अद्यावत सभागृह मौजे कान्हे – आंबेवाडी येथे उभारण्यात येणार आहे. (Development Works Bhoomi Pujan at Group Gram Panchayat Kanhe by MLA Sunil Shelke)
आंबेवाडी येथील सिद्धिविनायक सोसायटी मधील अंबादास पाचपोर यांनी 3 एकर जागा ग्रामपंचायतीला बक्षीसपत्र करून 7/12 ग्रामपंचायतीच्या नावे करून दिला आहे. यासाठी सरपंच विजय वामन सातकर, ग्राम पंचायत सदस्य किशोर प्रभाकर सातकर व भाऊ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. त्याबद्दल सरपंच विजय सातकर आणि ग्रामपंचायत कान्हे यांच्या वतीने अंबादास पाचपोर यांचा सन्मान व आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती होती. सोबत वडगावचे मा. नगराध्यक्ष मयुर ढोरे, किशोर सातकर, संदीप आंद्रे, प्रकाश आगळमे, ग्रामस्थ, महिला भगिनी, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– वडगावात 1 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा, नवजोडप्यांना मिळणार अनेक वस्तू, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी । Vadgaon Maval
– शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत आंदर मावळमधील भोयरे गावात आठवडे बाजाराचे उद्धाटन!
– तळेगाव येथे नागरी सहकारी बँकांच्या वसूली अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय ‘कर्ज वसूली प्रशिक्षण शिबिर’ । Talegaon Dabhade