Dainik Maval News : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे प्रमुख वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मावळ तालुका आणि लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात एकूण 67 दात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान आघाडीचे अध्यक्ष गणेश भेगडे आणि मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे गटनेते देविदास कडू, प्रदेश सरचिटणीस जितेंद्र बोत्रे, माजी नगरसेविका रचना सिनकर, कांचन गायकवाड, माजी नगरसेवक राजाभाऊ खळदकर, दत्तात्रय येवले, बाळासाहेब जाधव, प्रदेश सदस्य आशिष बुटाला, शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलास बडेकर, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गुंड, सखाराम कडू, अर्जुन पाठारे, जयप्रकाश परदेशी, प्रथमेश पाळेकर, हर्षल होगले यांच्यासह भाजपचे आजीमाजी पदाधिकारी उपस्थित होते. ( Devendra Fadnavis birthday blood donation camp from BJP in Lonavala )
कार्यक्रमाची प्रस्तावना मांडताना माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव आणि भाजप तालुकाध्यक्ष दत्तात्रय उर्फ भाऊ गुंड यांनी, कोरोना काळात रक्ताचा जाणवलेला तुटवडा परत कधीही जाणवू नये यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने पुढं येऊन रक्तदान करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केले. तसेच या पदाधिकाऱ्यांनी स्वतःही रक्तदान करून आदर्श उभा केला.
अधिक वाचा –
– हुल्लडबाजी करणे, बंदी असलेल्या ठिकाणी जाणे भोवले ; लोणावळ्यात 48 पर्यटकांवर कारवाई । Lonavala News
– आरोपींना फाशी द्या, पीडित कुटुंबाला न्याय द्या ! मावळातील तिहेरी हत्याकांडाचा मुस्लीम समाजाकडून निषेध, प्रशासनाला निवेदन
– ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तळेगाव शहर भाजपा अध्यक्षांचा राजीनामा, कार्यकर्त्यांना धक्का । Talegaon Dabhade