व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 18, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

फडणवीस सरकारचा निर्णय ! आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ, हयात जोडीदारालाही मिळणार मानधन

सन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना कारावास भोगावा लागलेल्यांना आता वाढीव मानधन मिळणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 18, 2025
in महाराष्ट्र, देश-विदेश
Cabinet meeting decision Chief Minister Devendra Fadnavis

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना कारावास भोगावा लागलेल्यांना आता वाढीव मानधन मिळणार आहे. तसेच मानधनधारकाच्या हयात जोडीदारालाही मानधन देण्याचा आणि अन्य काही अटी शिथिल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

देशात 25 जून, 1975 ते 31 मार्च, 1977 या कालावधीत आणीबाणी घोषित करण्यात आली होती. या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देणाऱ्यांना कारावास भोगावा लागला. अशा व्यक्तींच्या सन्मानार्थ, त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी 2018 मध्ये दरमहा मानधन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

त्यानुसार आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्यांना दरमहा वीस हजार रूपये व त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस दरमहा दहा हजार रूपये मानधन देण्यात येईल. एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या आणीबाणीधारकांना दरमहा दहा हजार रूपये तर त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस पाच हजार रूपये मानधन देण्यात येईल.

हयात असलेल्या जोडीदारास मानधनासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती 2 जानेवारी, 2018 पूर्वी हयात नसल्यास त्याच्या पश्चात त्याच्या जोडीदारास शपथपत्र जोडून अर्ज करता येणार आहे. यासाठीची मुदत याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाल्यापासून 90 दिवसांचा राहणार आहे. या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी यापूर्वी अटकेच्या वेळी किमान वय 18 असणे आवश्यक होते, ही अट रद्द करण्यात आली आहे.

tata tiago ads may 2025

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कुंडमळा ठिकाणी दर्शक गॅलरी असणारा पूल उभारणार, अतिरिक्त निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
– जिल्ह्यातील सर्व पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
– वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat


dainik maval ads may 2025

Previous Post

राज्यात मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, जवळपास साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण, मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

Next Post

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर यापुढे कारवाई नाही ; परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
No further action will be taken against bicycle carriers installed at back of vehicles

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर यापुढे कारवाई नाही ; परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

अत्यंत दुःखद ! देहू-आळंदी रस्त्यावर भरधाव क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

June 18, 2025
Ajit-Pawar

तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar

June 18, 2025
No further action will be taken against bicycle carriers installed at back of vehicles

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर यापुढे कारवाई नाही ; परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

June 18, 2025
Cabinet meeting decision Chief Minister Devendra Fadnavis

फडणवीस सरकारचा निर्णय ! आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ, हयात जोडीदारालाही मिळणार मानधन

June 18, 2025
Farmers of Maval taluka have started sowing of rabi season

राज्यात मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, जवळपास साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण, मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

June 18, 2025
Weather stations

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार हवामान केंद्रांची उभारणी ; महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ

June 18, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.